वाचन साखळी समूह
महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचय
*एक होता कार्व्हर* 📚📚
*पुस्तक क्रमांक* 4
*परिचय कर्ता* *सौ.अंजली शशीकांत गोडसे शिर्के*
*मर्ढे सातारा*
✍🏻✍🏻
निसर्गानेच जन्म दिला
अवघ्या मानवजातीला
उच्चनीच तो भेद कसला
सारी लेकरं समान काळ्या मातीला
आपल्या अवतीभवती का निसर्ग सर्व सजीव सृष्टीचा निर्माता आहे निसर्गाने एक सुंदर असं निसर्गचक्र निर्माण केलं पण या मानवजातीने निसर्गाच्या विरोधात जाऊन प्रगती करण्यास सुरुवात केली आणि समस्त जीवसृष्टी तुला धोक्यात आणलं पण याच निसर्गाकडे चला म्हणणारे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यासारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळाच ठसा समाजमनावर उमटवतात निसर्गाने कोणताही भेदभाव केला नसताना मानवाने मात्र उच्च नीच काळा गोरा असा भेदभाव करायला सुरुवात केली आणि मानव जातीतील माणुसकी संपायला लागलि पण याही संकटाशी सामना करत आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक आगळा वेगळाच ठसा सर्व लोकांच्यावर आणि त्यांच्या मनावर उमटवणाऱ्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना मानाचा मुजरा🙏🏻🚩
कार्व्हरांसारख्या झाकल्या माणिकांना आपल्यासमोर घेऊन सर्वांना प्रेरणा देणारे आदरणीय लेखिका वीणा गवाणकर ताईंना त्रिवार अभिवादन तसेच ज्यांच्या मुळे या पुस्तक रूपी विचारांचा खजिना माझ्या हाती सुपूर्द करण्यात आला त्या प्राज परिवाराला शतशः नमन ! पुस्तक हातात पडले ते ग्यान प्रकाशन फाउंडेशन मुळे त्यांचेही मनस्वी धन्यवाद🙏🏻😊
कोणतेही पुस्तक हाती पडले की खजिनाच सापडल्याचा मला आनंद होतो एक होता कार्वर पुस्तक मी वाचलं होतं तरी पुन्हा पुस्तक हातात पडल्यावर ते झपाटल्यासारखे वाचून काढली एका काळ्या रंगाच्या मुलांने वर्णभेदाची चटके सोसून केलेले संशोधनाचे महान कार्य सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.
*खरोखरच दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं* या वाक्याची प्रचिती या चरित्र ग्रंथातून आपल्याला मिळते कार्व्हर यांचा सारा जीवन प्रवास थक्क करणार आहे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल असलेला आपला न्यूनगंड काढून आपल्या आवडत्या कार्यात आपण काम करतो ना तेव्हा तेव्हा इतिहास घडतो.
प्राज परिवाराने काढलेली ही विशेष आवृत्ती खरोखरच सर्व बाबतीत सरस ठरली आहे मुखपृष्ठ मलपृष्ठ कागद छपाई यातील सुबकता खूप छान आहे जेव्हा आपल्यात
जगापेक्षा वेगळं करण्याची धमक असते ना अशा सर्वांनी तर हे पुस्तक अवश्य वाचलच पाहिजे.
निसर्गाशी समरस झालेले कार्व्हर यांचे व्यक्तिमत्व निसर्गाकडे चला हा शुभ संदेश देत आहे मी जास्त बोलत नाही कारण तुम्हा सर्वांनी ते पुस्तक घेऊन आवर्जून वाचलं पाहिजे. एक होता कार्व्हर वाचुन अनेक कार्व्हर नव्या युगात जन्म घेतील निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टीत आपली नकळत बदलून जाते टाकाऊ म्हणून टाकून देणाऱ्या वस्तू मधून अनेक टिकाऊ पदार्थ वस्तू बनवण्याची मनोमन प्रेरणा जागृत होईल शाश्वत कृषी विकासाची प्रेरणा मिळेल प्राज परिवाराने अतिशय सुंदर प्रेरणादायी पुस्तकाची आवृत्ती काढून रसिकांना व नवीन संशोधकांना नवीन नावीन्यतेची दृष्टी दिली आहे
प्राज परिवाराचे संस्थापक आदरणीय डॉक्टर प्रमोद चौधरी साहेबांचे शतशः आभार तुमच्या प्रेरणेतूनच कृषी क्षेत्राला एक नवसंजीवनी मिळेल
शेवटी एवढचं म्हणेन
*वाचावा कार्व्हर*
*शोधावा कार्व्हर*
*स्मरावा कार्व्हर*
*घडावा कार्व्हर*
*काळ्या आईच्या लेकरात*
✍🏻✍🏻
*सौ.अंजली शशीकांत गोडसे शिर्के*
*मर्ढे सातारा*
No comments:
Post a Comment