काळजात घर करून राहिलेले काळे हात*
*काळजात घर करून राहिलेले काळे हात*
*काळजात घर करून राहिलेले काळे हात*
मानवाला ज्या वेळेस अग्नीचा शोध लागला तेव्हापासून मानव आपले अन्न भाजून आणि शिजवून खाऊ लागला. हळूहळू मानवाची प्रगती होत गेली आणि अन्न शिजवण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या.
*घरातील चूल आपल्या काळजात घर करून राहणारी आपली संस्कृती* मग ती दगडांची व विटांची , सिमेंटची असो....या चुलीशी आपली नाळ जन्मजन्मांतरीची. कितीही आधुनिक साधनांनी आत्ताचे स्वयंपाक घर समृद्ध असले तरीही आईच्या हातांनी बनलेली चुलीची श्रीमंती आणि त्या हातांची चव आत्ताच्या आधुनिक साधनांना येणार नाही.
घरातील चूल काळजात घर करून राहिली.... अन् आत्ता जुन्या चुली जाऊन नवीन गॅस घरी आले. आणि आज पुन्हा एकदा गॅस सोडून माणसे आवडीने चुलीवरचा खास स्वयंपाक खाण्यासाठी हॉटेल गाठू लागली. किंवा आपल्याच आसपास एखादी चूल करून कधीतरी त्याच्यावर स्वयंपाक करू लागली.
आज मी ही तशी चूल करून त्यावर स्वयंपाक केला.आणि ती चुलीवरची काळी झालेली भांडी घासताना माझे हात मात्र काळे झाले. त्या हातांना पाहून आईची आठवण माझ्या हृदयात, डोळ्यात भरभरून आली.
जिने या हाताला जन्म दिला आणि या हातांचे वैभव आणि आयुष्य घडवण्यासाठी आपल्या हातांची तमा न बाळगता आयुष्यभर झिजत राहिली,आपल्या या हातांच्या ओंजळीत आपली भाग्यरेषा लिहिली. थंडीच्या दिवसात जेव्हा आपली आई काळी भांडी घासायची, तेव्हा तिचे हातही असेच काळे व्हायचे. आम्ही लहान असताना, मोठे मोठ्या गमतीनं ते हात पहायचो त्यावेळेस त्या कष्टाचे मोल समजत नव्हतं. पण आत्ता ज्या वेळेस त्या कष्टाचे मोल समजतंय तर ती अनमोल आई आणि तिचे आईपण कुठेतरी हरवून बसले आहे....... ते कधीच परत न येण्यासाठी....... त्यामुळे त्या काळ्या हातांची लाज न वाटता त्या मागच्या प्रेमाचा अभिमान आणि स्वाभिमान वाटलाच पाहिजे......
✒️✍🏻
सौ.अंजली शशिकांत गोडसे मर्ढे सातारा
छान
ReplyDeleteअप्रतिम लेखन
ReplyDeleteखूप सुंदर लिहिले आहे...
ReplyDeleteअतिशय भावपूर्ण लेखन..
ReplyDeleteवा छान
ReplyDeleteNice
ReplyDeleteखुप छान ताई
ReplyDeleteखूप छान, मॅडम
ReplyDeleteवाचताना डोळे ओले झाले.
ReplyDeleteजुन्या आठवणींना उजाळा मिळाला.खरंच खुप छान होते ते दिवस.आता परत कधीच ते दिवस येणार नाही👌👌👌❤❤
खरच आहे छान लिहिले आहे या एकदा आमच्या कडे चुलीवरचे जेवण जेवायला
ReplyDeleteखूप सुंदर, त्या हातामध्ये स्वाभिमान आणि कर्तव्यता असते.
ReplyDeleteHeart touching
ReplyDeleteSo imotional Writing mam
ReplyDeleteखूप छान, अंजू
ReplyDeleteअगदी खरं !छान लिहलेस.
ReplyDeleteगुरुमाऊली तुमचे लेखन आणि ज्ञानआकलन खूप महान आहे असेच लिहीत जा आम्हाला तुमचा अभिमान आहे.
ReplyDeleteखुपच छान लिहले आहे,अगदी खरं वास्तव चित्र डोळ्या समोर उभ रहिल.🙏
ReplyDeleteआई थोर तुझे उपकार
ReplyDeleteवास्तव👍👌
ReplyDeleteमन भारावून गेल.गेल.खुप छान लेख आहे.
ReplyDeleteछान...
ReplyDeleteतुमच्या या लेखामुळे आईशी निगडीत खूप गोष्टी मनाच्या एका कप्प्यातून डोळ्यासमोर तरळून गेल्या.
ReplyDeleteखूप छान लेख
अंजु मॅडम अप्रतिम लेखन👌👌👌बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
ReplyDeleteअंजू खूप छान लिहिलाय लेख. जुन्या आठवणी ताज्या झाल्या वाचताना. प्रत्येकाच्या मनात एक असा कोपरा असतो जो अशा अविस्मरणीय आठवणींनी भरून भरलेला असतो. त्याला उजाळा मिळाला.
ReplyDelete