*कर्तव्याचे भान*
*एक जोडी पायताण*
🥿👠👡 👢🥾👟
आयुष्यात कधीच सर्व प्रश्नाची उत्तरे विधात्याला मागायची नसतात, काही उत्तरे आपणच शोधायची असतात. माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होत असतो.
माणूस जन्माला आला त्यावेळेस ना कापड होते ना आभूषणे ना पायातलं पायताण. जशी माणसाची बुद्धी चालत गेली तशी प्रगती होऊन माणसाची गरजही वाढत गेली .जशी प्रगती झाली तस पैसा हातात येऊ लागला आणि पैसा गरजेपेक्षा जास्त आला की मागण्या ही जास्त होऊ लागल्या .विलासी जीवन आलं .अन्न, वस्त्र ,निवारा या प्राथमिक गरज भागूनही माणूस त्यापेक्षाही जास्त खर्च करू लागला. आणि एक नवा ट्रेंड निर्माण झाला ज्याच्याकडे जास्त पैसा आला तो अधिकच श्रीमंत होत गेला. नकळतच जसा समाज बदलला तशी माणसांची मानसिकता ही बदलत गेली .एक घर करुन राहणारा माणूस आता जाईल तिथे घर करून राहायला लागला. गावाकडचे घर शहराकडे घर .जमेल तिथे जागा घेऊन माणूस पैसा गुंतवू लागला. कपड्यांचं तर काही विचारूच नका .वापरा आणि टाकून द्या विचारसरणी असलेल्या या जमान्यात कपड्यांचे घरोघरी ढीग लागलेले दिसतात .पूर्वी फक्त दिवाळी आणि यात्रा असली की वर्षाला कुठेतरी एक ड्रेस मिळायचा. एका ड्रेसवर सगळे सण साजरे व्हायचे पण आता प्रत्येक सणाला नवीन ड्रेस लागतो नाहीतर आपले सण साजरे केल्यासारखे वाटत नाहीत .आणि हो ड्रेस नवीन आला कि त्याच्यावर नवीन चप्पल .जसा कार्यक्रम तशी चप्पल. शाळेत जायला वेगळी, कॉलेजला वेगळी, समारंभात वेगळी, फिरायला जायला वेगळी, शौचालयास जायला वेगळी. एवढ्या वेगवेगळ्या चपल्या वापरूनही माणूस घराबाहेर वेगळी चप्पल वापरतो आणि घरात वेगळी चप्पल वापरतो.जस की माणसाचं वागणं घरात एक आणि बाहेर एक. माणूस बदलत गेला पण अजूनही खेडेगावात काही घरं अशी आहेत की त्यांना एकाच रंगाचे दोन सारख्या चप्पल वापरता येत नाही .मी ऐकलंय म्हणे शहरात वेगवेगळ्या रंगाचे बूट घालण्याची फॅशन आली पण ज्यांनी वेगवेगळ्या रंगाचे चप्पल घालून दिवस काढलेत त्याचं मोल हजारो किंमत असलेल्या बुटांना किंवा चप्पलला असणार नाही . प्रत्येक ड्रेस वर वेगवेगळे चप्पल घालून मिरवण्याचा हा जमाना कुठे आणि वेगवेगळ्या रंगाचे चप्पल घालून शिक्षण घेण्याचा अट्टाहास करणारे आजची चिमुकली पावले कुठे.माझ्या शाळेत येणाऱ्या त्या चिमुकलीच्या पायात मी वेगवेगळी चप्पल पाहिली आणि मन गलबलून गेलं. ही तफावत कधी मिटणार माहीत नाही. या लेकीला तर चप्पल मिळाली पण अशी असंख्य मुले आज विना चप्पलची आपल्या अवतीभवती फिरत आहेत जमेल तशी त्यांना मदत करा एवढीच अपेक्षा.
*गतिशील चपलांसाठी..*
*कृतिशील मदत*..!
🙏🏻❤️🩴🥿👠👡👢👞👟🥾
खूप छान लिहिले आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. आहे. 👏👍
ReplyDeleteखूप अंतरीचे लेखन,🙏 गरज आहे जाणिवांची.
ReplyDeleteमनामनात अशी भावना रुजावी आणि अनवाणींना चप्पल मिळावी . सुंदर .
ReplyDeleteकाळजाला भिडणारा लेख👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर्वांचे🙏
ReplyDeleteसमाजिक भान जपणारे... काळजाला भिडत काळजीत पडणारे .. 'काळजातील शब्द'
ReplyDeleteKhup chan a anju ani bhyanak vastavta ahe hi aj samajat garib garib ch rahtoy salute to you dear for presenting this in this way
ReplyDeleteखूप सुंदर लिहिले आहे
ReplyDeleteमाझा आजीचा पाया मध्ये असायच्या अशा चपला
छान लिहीली वेदना !अभिनंदन !
ReplyDeleteखूप छान अंजली मॅडम दिसतं सगळ्यांनाच पण तुमच्या दृष्टी पलिकडचं पाहण्याच्या दृष्टीला सलाम
ReplyDelete